गाडी अडवून व्यावसायिकावर चाकूने वार

0
111

खेड, दि. ३० ऑगस्ट (पीसीबी) – कोणतेही कारण नसताना व्यवसायिकाची गाडी अडवून त्याला मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.29) सायंकाळी भोसे ता.खेड येथे घडली.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गणेश कुंडलिक कुऱ्हाडे (वय 22 रा.भोसे, खेड) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सौरभ रमेश कुठे, सुरज उर्फ उद्धव रमेश कुठे, ओंकार उर्फ मोन्या नवनाथ पहाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. फिर्यादी हे त्यांच्या गाडी मधून जात असताना आरोपीनी त्यांची गाडी अडवली. यावेळी काही कारण नसताना त्यांना कानाखाली मारून गाडी बाहेर खेचले. शिवीगाळ करत जीवे मारण्याचे धमकी दिली. आपण इथले भाई आहोत, आपलं कोणी काही वाकड करू शकत नाही म्हणून फिर्यादी यांच्या अंगावर चाकूने वार केले. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.