गाडीवरील ताबा सुटल्याने नदीच्या पुलावरुन कार कोसळून तीन जणांचा मृत्यू

0
50

सांगली, दि. 28 (पीसीबी) : सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात बुधावारी रात्री एकच्या सुमारास घडला आहे. ही घटना कोल्हापूरवरुन सांगलीकडे येताना कृष्णा नदी पुलावरून घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका 5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

प्रसाद भलचंद्र खेडेकर (वय-40), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय-35), वैष्णवी संतोष नार्वेकर (वय-23) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर (वय-42), वरद संतोष नार्वेकर (वय-21) आणि समरजित प्रसाद खेडेकर या 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री लग्न सोहळा आटपून कोल्हापूरवरुन सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदीपात्रात कोसळली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण जखमी अवस्थेत आहेत. अपघातातील मृत कुटुंबीय सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत.