गाडीवरील कर्ज निर्माण करता गाडीची विक्री करत नागरिकाची फसवणूक

0
143

चिंचवड, , दि.५ (पीसीबी)

गाडीवर करत असताना देखील त्या गाडीची विक्री करत नागरिकाची 5 लाखांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 15 मार्च ते आजपर्यंत अशी चिंचवड येथे घडली आहे.

याप्रकरणी दिलीप भादू कुंभार (वय 50 रा.चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी महादेव कदम (रा. चऱ्होली) व पुंडलिक श्रीहरी अभंगे (राक्षेवाडी पुणे) या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी ह्युंडाई कंपनीची ग्रँड आहे (एम एच 14 के बी 37 96) ही गाडी खरेदी करण्यास भाग पाडली.यावेळी गाडीवर केवळ दीड लाख रुपयांचे लोन आहे,असे सांगून फिर्यादी यांच्याकडून पाच लाख 40 हजार रुपये घेण्यात आले. मात्र प्रत्यक्षात गाडीवर सात लाख रुपयांचे लोन होते. यावेळी कर्ज नील न करता फिर्यादी यांना कोणतीही एनओसी मिळवून न देता पैशांचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.