गाडीला रस्ता देण्यावरून कार चालकाकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

0
1021

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) – गाडीला बाजू दिली नाही म्हणून कार चालकाने दुचाकीस्वाराल बेदम मारहाण केली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.27) हिंजवडी येथे घडली आहे.

यावरून श्रीनाथ दिनकर जागडे (वय 29 रा.जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शिंदे (पुर्ण नाव माहिती नाही), गाडी चालक कुणाल येवले व इतर चार जण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपी त्यांच्या महिंद्रा एसयुव्ही या गाडीतून आले व त्यांनी गाडी बाजूने का चालवत नाही म्हणून फिर्यादी यांना अडवले. यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात हातातील कड्याने मारहाण केली. त्याने इतर आरोपींना बोलावून लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने फिर्यादी व त्यांच्या मित्रालाही मारहाण केली. आरोपी केवळ मारहाण करून थांबले नाहीत तर त्यांनी फिर्यादी यांची दुचाकी देखील घेऊन गेले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.