गाडीला धडक बसल्याच्या बहाण्याने लुटले ; दोघांना अटक

0
298

बाणेर, दि. १८(पीसीबी) – गाडीला धडक बसल्याचा तसेच त्यात आपण जखमी झाल्याचा बहाणा करून दोघांनी एकाला लुटले. ही घटना 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी बाणेर येथे घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पराग प्रकाश रस्तोगी (वय 47, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल संजय मराठे (वय 21, रा. भुकूम, ता. मुळशी), हर्षल सुनिल गोळे (वय 20, रा. पिरंगुट, रा. मुळशी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्तोगी हे बेंगलोर-मुंबई महामार्गावर बाणेर येथे आले असता आरोपी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आले. तुझ्यामुळे मला दुखापत झाली. माझा मोबाईल पडल्याने बंद झाला. गाडीला धक्का लागला असे हिंदीतून बोलून फिर्यादींसोबत जबरदस्ती केली. फिर्यादीची कॉलर पकडून शिवीगाळ केली. मारण्याची धमकी देऊन सात हजार रुपये जबरदस्तीने नेले. हिंजगदी पोलीस तपास करीत आहेत.