गाडीला कट मारल्याच्या कारणावरून बस चालकास मारहाण

0
682

महाळुंगे, दि. १ (पीसीबी) – गाडीला कट का मारला, असा जाब विचारत एका व्यक्तीने बस चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास स्पायसर चौक, कुरुळी येथे घडली.

करीम दस्तगीर तांबोळी (वय 30, रा. राजगुरूनगर, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विपिन सुरेश रेवसे (वय 28, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महाळुंगे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये बस चालक म्हणून काम करतात. कंपनीतून दुसऱ्या शिफ्टचे कामगार सुटल्यानंतर त्यांना घरी घेऊन जात असताना स्पायसर चौकात आरोपीने फिर्यादी यांची बस अडवली. गाडीला कट का मारला, असा जाब विचारत आरोपीने फायबरच्या पाईपने फिर्यादीस मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.