गाडीला कट मारला म्हणून दोघांना बेदम मारहाण

0
630

भोसरी, दि. १४ (पीसीबी): गाडीला कट मारला म्हणून तिघांनी दोघानां बेदम मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.12) नाशिक-भोसरी महामार्गावर भोसरी येथे घडली आहे.

याप्रकरणी श्रीधर लक्ष्मण पवार (वय 28 रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून विजय चव्हाण, पंकज वर्मा, बाब्या सर्व रा. भोसरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र दुचाकीवरून जात होते. यावेळी गाडीला कट मारला म्हणून आरोपींनी फिर्यादींना अडवून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. फिर्यादी यांच्या मित्रालाही हाताने मारहाण करत जखमी केले. यावरून भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.