गाडीतून पेट्रोल चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडले

0
231

चाकण ,दि.१७(पीसीबी) – पार्क केलेल्या दुचाकी मधून पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना चाकण येथे मंगळवारी (दि.15) घडली.

याप्रकरणी नवनाथ रामनाथ येडे (वय 36 रा चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मेहबूब मकबूल नदाफ (वय 22) याला अटक केली असून त्याचा साथीदार सचिन गायकवाड याच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हे घराच्या कडी बाहेरून लावत व घरासमोर पार्क केलेल्या दुचाकी मधून पेट्रोल काढत असत. मंगळवारी देखील त्यांनी असेच केले त्यांनी फिर्यादीच्या घराला बाहेरून कडी लावली व पार्क केलेल्या दुचाकी मधून पेट्रोल काढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी फिर्यादी यांचे शेजारी सुनील मधुकर चव्हाण यांना पेट्रोलचा वास आला. ते घराच्या बाहेर आले त्यांनी पाहिले तर फिर्यादी यांच्या दुचाकीचे पेट्रोलचे लॉक तुटलेले होते त्यातून पेट्रोल खाली पडत होते. त्यांनी तो वॉल बंद केला व फिर्यादी यांच्या घराची लावलेली कडी काढली. यावेळी आरोपी मेहबूब हा तेथे जवळ असलेल्या संडास मध्ये लपल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित जाऊन मेहबूब याला पकडले मात्र त्याचा साथीदार सचिन हा तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. नागरिकांनी चोराला पकडून चाकण पोलीस ठाण्यात हजर केले असता पोलीस नी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.