गाडीच्या फुटलेल्या काचेतून सव्वा तीन लाखांचे सोने चोरीला

0
139

हिंजवडी, दि. २१ ऑगस्ट (पीसीबी )

गाडीच्या फुटलेल्या काचातून गाडीतून तब्बल 80 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले आहे. ही घटना 16 ऑगस्ट रोजी सकाळी बावधन येथे घडली आहे.

यावरून महेश मारुतराव झोपडेकर (वय 57 रा. कोल्हापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कारची काच अपघाताता फुटली होती. या फुटलेल्या काचेद्वारे चोरीने घाडीतीलपर्स पळवली ज्यामध्ये कागदपत्रे व 80 ग्रॅम वजनाचे 3 लाख 40 हजार 200 रुपयांचे दागीने चोरून नेले आहे. यावरून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.