गाडगेबाबा हे स्वच्छता संस्कृतीचे जनक – काशिनाथ नखाते

0
200

पिंपरी, दि.२० (पीसीबी) – समाजात पसरलेली अस्वच्छता दूर करण्याच्या दृष्टीने आपल्या हातात खराटा घेऊन मोटर स्थानक, रेल्वे स्थानक, गोठे ,गटारे, पटांगण, गावे,रस्ते असे वर्षानुवर्षे सार्वजनिक स्वच्छतेचे काम करून अस्वच्छतेचे दुष्परिणाम काय आहेत हे समाजाला पटवून दिले विसंवादाकडून संवादाकडे जाणारे महाराष्ट्राचे सुपुत्र संत गाडगेबाबा हे स्वच्छता संस्कृतीचे जनक होते असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ, सारथी चालक-मालक महासंघ , घरेलु कामगार महासंघा ,फेरीवाला क्रांती महासंघतर्फे आज संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते

यावेळी चंद्रकांत कुंभार, उमेश डोर्ले, सलीम डांगे, माधुरी जलमुलवार, अरुणा सुतार, माया चिकने, अर्चना कांबळे,राखी जाधव आदी उपस्थित होते. नखाते म्हणाले अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या गावी जन्म झालेले संत गाडगेबाबा सबंध महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला स्वच्छतेच्या संदेश देऊन गेले प्रवासाची त्यांना विलक्षण आवड होती या भ्रमतीमध्ये त्यांनी विविध प्रकारचे लोक दिसून येत, उपाशी रोगी गरीब आडानी,कमी शिकलेले, व्यसनाचे आहारी गेलेले अशा प्रकारच्या अनेक लोकांना आदराने व अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याची सुरुवात गाडगेबाबांनी केली. प्रसारासाठी त्यांनी कीर्तन हे प्रमुख माध्यम निवडले आणि अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर वारंवार प्रहार केले संत गाडगेबाबा कायम स्मरणात राहतील. प्रस्तावना फरीद शेख यांनी केली तर आभार जितेंद्र कदम यांनी मानले.