गांधी जयंती पासून `हॅलो` एवजी `वंदेमातरम्`

0
291

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गांधी जयंतीपासून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याअंतर्गत हॅलो ऐवजी वंदेमातरम् अभियानाचा शुभारंभही होणार आहे. या अभियानात राज्यातील जनतेनं सहभागी व्हावं, असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित केला आहे. या सेवा पंधरवड्यानिमित्त आता राज्यातील जनतेनं फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदेमातरम् बोलावं असं आवाहन शिंदे-भाजप सरकारनं केलं आहे. या अभियानाचा शुभारंभ वर्धा या महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमातून होणार आहे.

दरम्यान, देशातील प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, त्यादृष्टीनं राज्यातील जनतेनं एकमेकांशी संवाद साधताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावं, असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे.