गांधीनगर मध्ये आठ वाहनांची तोडफोड

0
238

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधीनगर येथे दोघांनी मिळून सात ते आठ वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 19) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली.

पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगर परिसरात रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोघेजण सळ्या घेऊन आले. त्या दोघांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली सात ते आठ वाहनांवर सळईने मारून त्यांचे नुकसान केले. वाहनांचे नुकसान करून दोघेजण पळून गेले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत.