गांजा विक्री प्रकरणी भोसरीत एकाला अटक

0
693

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – गांजा विक्री प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून सुमारे चार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 8) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास बालाजी नगर एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली.

बापू प्रभू मदने (वय 38, रा. सोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमलदार विशाल काळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर येथील नाल्याच्या बाजूला एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून बापू मदने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन लाख 97 हजार 200 रुपये किमतीचा तीन किलो 972 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.