गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

0
276

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – अमली पदार्थ विरोधी पथकाने बालाजीनगर झोपडपट्टीत कारवाई करून गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. 2) दुपारी सव्वाबारा वाजता करण्यात आली. याप्रकरणी पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने विक्रीसाठी गांजा बाळगला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महिलेकडून 742 ग्रॅम वजनाचा 18 हजार 850 रुपयांचा गांजा जप्त केला. तो गांजा महिलेने दुस-या महिलेकडून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्या महिलेविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.