गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक

0
2

दहा किलो गांजा जप्त

दिघी, दि. १२ (प्रतिनिधी)
भोसरी-आळंदी रोडवर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १०) रात्री करण्यात आली.

प्रतीक नारायण पवार (वय २१, रा. सातारा), धीरज शाम पाटील (वय २२, रा. धुळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर राख यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी-आळंदी रोडवर बनाचा ओढा येथे दोघेजण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत प्रतीक आणि धीरज या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहा किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.