बावधन,दि.03 (पीसीबी)
गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २) दुपारी बावधन येथे करण्यात आली.
महेश चंद्रकांत कमलापुरे (वय ३८), विशाल अरुण वाल्हेकर (वय ३०, दोघे रा. कात्रज, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह शिवदास बबन पवार (रा. धाराशिव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सदानंद रुद्राक्षे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे अभिदांते चौकात एक रिक्षा आली असून त्यामध्ये गांजा आणला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रिक्षा सह महेश आणि विशाल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० किलो १२० ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन, ८८० रुपये रोख रक्कम आणि रिक्षा असा एकूण सात लाख १६ हजार ८८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.