गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक

0
224

गांजा विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 12 हजार 370 रुपये किमतीचा दोन किलो 232 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 28) दुपारी तीन वाजताच्या सुमारास गणेश नगर येथे करण्यात आली.

नूर महिताब अली शेख (वय 28, रा. दापोडी), गणेश विनायक काटे (वय 32, रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नगर मधील गणेश गार्डन सोसायटीमध्ये दोघेजण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून नूर शेख आणि गणेश काटे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 12 हजार 370 रुपये किमतीचा दोन किलो 232 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.