गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक

0
188

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- गांजा विक्री प्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास म्हातोबानगर झोपडपट्टी वाकड येथे करण्यात आली.

संकेत अशोक थोरात (वय 19, रा. येवले चाळ वाकड) आणि एक महिला या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार सुहास पाटोळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गांजा बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी महिलेच्या घरात छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांना दोन किलो 375 ग्रॅम वजनाचा बारा हजार रुपयांचा गांजा आढळून आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.