गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

0
51

निगडी, दि.11 (पीसीबी)
गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १०) दुपारी पत्राशेड अजंठानगर येथे करण्यात आली.

प्रकाश रवी पांडे (वय २३, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मयूर वाडकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश पांडे हा गांजा बाळगताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून १५ हजार ९५० रुपये किमतीचा २१४ ग्रॅम गांजा जप्त केला. हा गांजा त्याने अजंठानगर येथील एका महिलेकडून आणला असल्याचे समोर आल्याने महिलेविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.