गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

0
80

निगडी, दि. 13 (प्रतिनिधी)

गांजा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 310 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) सायंकाळी संभाजीनगर चिंचवड येथे करण्यात आली.

अतिश संजय निंबाळकर (वय 25, रा. निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार देवा राऊत यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर चिंचवड येथे एक जण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आतिश निंबाळकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 15 हजार 500 रुपये किमतीचा 310 ग्रॅम गांजा जप्त केला. निगडी पोलीस तपास करीत आहे.