देहूरोड, दी. २० (पीसीबी)
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा विक्री प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून २१४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १९) दुपारी चव्हाणनगर, तळवडे येथे केली.
संतोष देवराम कांबळे (वय ४१, रा. तळवडे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गोविंद डोके यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संतोष कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार ७०० रुपये किमतीचा २१४ ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.