गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

0
68

पिंपरी, दि. 11 (पीसीबी) –

गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास रामनगर चिंचवड येथे केली.
अण्णा पांडुरंग पवार (वय 34, रा. दत्तनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विष्णू भारती यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर चिंचवड येथील बंद पडलेल्या मंडईच्या समोर एक व्यक्ती गांजा घेऊन आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अण्णा पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचा 624 ग्रॅम गांजा जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.