गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

0
316

नेहरूनगर, दि. ७ जून, (पीसीबी)-गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 6) 31 किलो गांजा पकडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

संजय मोहन शिंदे (वय 36, रा. नेहरूनगर, भोसरी एमआयडीसी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सुरज झंजाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गावठाणातील लाक्ष्मिपुर्ती चाळीत एकाने गांजा साठवून ठेवला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून संजय शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्या खोलीतून 31 किलो 268 ग्राम वजनाचा सात लाख 81 हजार 700 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. हा गांजा त्याने सुरज झंजाळ याच्याकडून आणला असल्याचे सांगितल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.