गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक

0
91

दिघी, दि. 05 (पीसीबी) : गांजा विक्री करणाऱ्या एकाला दिघी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दहा हजार 800 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 4) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास डुडुळगाव येथे करण्यात आली.

रामेश्वर श्रीहरी गायकवाड (वय 35, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार चेतन साळवे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डुडुळगाव येथे आळंदी मोशी रोडवर एक जण गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रामेश्वर गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा हजार 800 रुपये किमतीचा 108 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.