गांजा विक्रीसाठी निघालेल्या महिलेला अटक

0
14

एक लाखाचा गांजा जप्त

वाकड, दि. 17 (पीसीबी)
गांजा विक्रीसाठी निघालेल्या महिलेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. महिलेकडून ९८ हजार ८०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १६) सकाळी म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड येथे करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक नारायण जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना त्यांना डांगे चौक ते दत्त मंदिर रोडवर म्हातोबा नगर झोपडपट्टी येथे एक महिला दुचाकीवरून संशयितपणे जाताना दिसली. पोलिसांनी तिला अडवून गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिक्की मध्ये ९८ हजार ८०० रुपयांचा गांजा, एक लाख रुपये किमतीची दुचाकी आणि १० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.