गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

0
89

भोसरी, दि. 19 (पीसीबी) : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) सायंकाळी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वराज्यनगरी, सेक्टर 12 येथे करण्यात आली.

सचिन उर्फ जग्गू साहेबराव जगताप (वय 47, रा. मोरेवस्ती, चिखली. मूळ रा. बारामती), अभिजीत उर्फ अभी हरिश्चंद्र कालेकर (वय 35, रा. स्वराज्यनगरी, भोसरी एमआयडीसी. मूळ रा. रत्नागिरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार जावेद बागसिराज यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि अभिजीत हे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वराज्यनगरी सेक्टर क्रमांक बारा येथे गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 39 हजार 100 रुपये किमतीचा 382 ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. आरोपींनी हा गांजा अजिंठा नगर चिंचवड येथे राहणाऱ्या एका महिलेकडून आणला असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.