गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक

0
229

गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 17) पहाटे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली.

दीपक सिकंदर इंद्रेकर (वय 24, रा. भाटनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील भाटनगर येथे एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दीपक इंद्रेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख दोन हजार 500 रुपये किमतीचा चार किलो 100 ग्राम गांजा, सहा हजार 500 रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.