गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक; 29 किलो गांजा जप्त

0
261

तळेगाव दाभाडे, दि. १९ (पीसीबी) – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 18) दुपारी शंकरवाडी तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

मनोज शंकरलाल प्रजापती (वय 27, रा. कळंबोली, पनवेल. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरवाडी येथे एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी सापळा लाऊन मनोज प्रजापती याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 29 किलो 152 ग्राम वजनाचा गांजा आणि 10 हजारांचा मोबाईल फोन असा एकूण सात लाख 38 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मनोज प्रजापती याने हा गांजा ओडीसा येथील शिवा सिमलीगोडा या व्यक्तीकडून आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.