शिरगाव, दि.10 (पीसीबी)
गांजा बाळगल्या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 3275 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 9) सायंकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गहुंजे येथे करण्यात आली.
अमित रामसकल यादव (वय 28, रा. नाशिक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तुकाराम साबळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित यादव मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने स्कॉर्पिओ कार मागून जात होता. त्याने गियरच्या मागील हॅण्ड रेस्ट मध्ये एका कॅरीबॅग मध्ये गांजा ठेवला. गहुंजे येथे शिरगाव पोलिसांनी कार अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 8.180 ग्रॅम गांजा, एक वजनकाटा आढळून आला. पोलिसांनी कार, गांजा आणि वजनकाटा असा एकूण 20 लाख पाच हजार 274 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.