गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
96

चिखली, दि. 22 (पीसीबी) –

गांजा बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 250 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 20) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे करण्यात आली.

अरशद अक्रम मलिक (वय 23, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमर कांबळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरशद मलिक याने त्याच्या टपरी मध्ये गांजा बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी कारवाई करत टपरी मधून 250 ग्रॅम वजनाचा 12500 किमतीचा गांजा जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.