गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
242

तळेगाव, दि. 12 (प्रतिनिधी)

गांजा बाळगल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 11) तळेगाव-चाकण रोडवर मधुबन सोसायटी जवळ करण्यात आली.

संदेश दत्तात्रय ठाकरे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मुरलीधर कोकतरे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदेश ठाकरे याने त्याच्याकडे 200 ग्रॅम वजनाचा गांजा बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 20 ग्रॅम वजनाच्या दहा पुड्या असा एकूण 10 हजार रुपये किमतीचा 200 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.