गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
435

हिंजवडी, दि. १ (पीसीबी) बावधन वाहतूक विभागाने चांदणी चौकात नाकाबंदी लावून एक दुचाकी संशयावरून पकडली असता त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दुचाकीस्वाराला अटक केली आहे.

रोहन उत्तम कांबळे (वय 22, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई समीउल्ला चाँदसाहेब काझी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन वाहतूक विभागाने चांदणी चौकात मंगळवारी (दि. 30) दुपारी नाकाबंदी लावली होती. दुपारी साडेबारा वाजता एक दुचाकी संशयितरित्या जाताना पोलिसांना दिसली. त्यामुळे पोलिसांनी दुचाकी थांबवण्याचा इशारा केला असता दुचाकीस्वार पळून जाऊ लागला. मात्र पळून जात असताना दुचाकी घसरून पडली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली असता दुचाकीमध्ये 20 हजार रुपये किमतीचा 630 ग्रॅम गांजा आढळला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.