गहूंजे स्टेडियमच्या पार्किंग मधून लॅपटॉप चोरीला

0
334

गहुंजे, दि. ७ (पीसीबी) – गहुंजे स्टेडियम येथील जगदंबा पार्कींग येथून तरूणीचा लॅपटॉप चोरीला गेला आहे. ही घटना गुरुवारी (दि.5)रात्री घडला.

याप्रकरणी 24 वर्षीय तरूणीने शुक्रवारी (दि. 6) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांचा 30 हजार रुपयांचा लॅपटॉप अज्ञाताने चोरून नेला आहे. त्यानुसार तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.