- सुसंस्कारित पिढी निर्माणासाठी भारतीय स्त्री शक्ती अग्रेसर
चिंचवड दि.२३ पीसीब – समाजामध्ये बोलतांना, वावरतांना गलिच्छ शिव्या देण्याचे बंद व्हावे, शिव्या देणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय स्त्री शक्ती पिंपरी चिंचवड शाखेतर्फे नुकतेच हवेली तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
भारतीय स्त्री शक्ती ही अखिल भारतीय स्तरावर काम करणारी अराजकीय संघटना असून महिलांच्या सुरक्षा व स्त्री सन्मान हे संघटनेचे प्राधान्याचे विषय आहेत. त्याच मुद्द्यांवर काम करत असताना सर्वत्र विशेष म्हणजे ग्रामीण भागात असे लक्षात आले की, आई बहिणीवर शिव्या देण्याचे प्रमाण अधिक आहे ,अनेकदा या शिव्या गलिच्छ आणि स्त्रियांच्या अवयवावर दिल्या जातात लहान मुलं ही हेच ऐकून याच वातावरणात वाढून पुढे तसेच करतात . वास्तविक पाहता भारतीय दंड संहिता कलम 509 व बदललेल्या कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता 2023 कलम 79 नुसार गुन्हा ठरतो असा गुन्हा झाल्यास गुन्हेगाराला शिक्षा देण्याचे प्रावधान या कायद्यात आहे याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी विनंती करीत आहोत.
अश्या आशयाचे निवेदन भारतीय स्त्रीशक्तीने श्री जयराज पाटील यांना दिले. एक प्रयत्न सुसंस्कारित
पिढी निर्माण करण्यासाठी समाजात सात्विक संस्कारीत
वातावरण निर्माण करण्याचा.
यावेळी पिंपरी चिंचवड सचिव मनाली जोशी, निवेदिता कच्छवा,रेश्मा शिंदे,स्वाती सातपुते ,शुभदा कुलकर्णी व अन्य सदस्य उपस्थित होते.