सांगवी, दि. 18 (पीसीबी)
गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने एका २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १४) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास सांगवी येथे घडली.
मयत २४ वर्षीय तरुणी ही दीड महिन्यांची गरोदर होती. तिने गर्भपात करण्यासाठी गोळ्या खाल्या. त्या गोळ्यांनी त्रास होऊ लागल्याने तिला ११ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.