गरोदरपणात उपचार न करता मारहाण करत विवाहितेचा छळ

0
445

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – गरोदरपणात महिलेला औषधउपचार न करता तिला मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2020 ते 5 जून 2022 या कालावधीत वाल्हेकरवाडी चिंचवड, परभणी, पनवेल येथे घडला.

अंकुश उत्तम आगलावे (वय 29, रा. पनवेल), अहिल्याबाई उत्तम आगलावे (वय 50), उत्तम आगलावे (रा. परभणी), अनिता राजकिरण कोकाटे (वय 28, रा. ढोकी, उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. त्यावरून विवाहितेला मारहाण केली. फिर्यादीवर संशय घेऊन त्यांच्या गरोदरपणात त्यांना औषध उपचार न करता त्यांच्या वडिलांना, भावाला मारहाण केली. तसेच फिर्यादीस मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.