बंगळुरू, दि. २६ (पीसीबी) – थंडीच्या दिवसात गरम, कडकडीत पाण्याने अंघोळ करण्याची मजाच वेगळी असते. तुम्हीही गॅस गीझरचा वापर करता का ? त्याचं उत्तर हो असेल तर मग सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण गॅस गीझरचा नीट वापर केला नाही, योग्य ती काळजी घेतली नाही तर ते धोकादायक ठरू शकते. त्याचा एक धक्कादायक अनुभव बंगळुरूमध्ये घटना घडली. बंगळुरूच्या अश्वथानगर भागात एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. एका 23 वर्षीय महिलेचा गॅस गीझरमधून निघालेल्या वायूमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले. गॅस गीझरमधून निघालेल्या कार्बन मोनोऑक्साइडमुळे गॅसच्या संपर्कात आल्याने तिचा मृत्यू झाला.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ती महिला तेव्हा सहा महिन्यांची गर्भवती होती. ही घटना घडली तेव्हा ती तिच्या 4 वर्षांच्या मुलाला बाथरूममध्ये अंघोळ घालत होती. बाथरूममधील त्या वायूमुळे तिचा तर मृत्यू झालाच पण तिच्या मुलाची तब्येतही अतिशय गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. पीडित महिला रम् हिचायाचा पती जगदीश घरी परतला असता मुख्य दरवाजा बंद असल्याचे त्याला दिसले. वैकुंठ एकादशी असल्याने संध्याकाळी मंदिरात जाऊन असे रम्याला तिच्या पतीने सांगितले होते, म्हणूनच ती तिच्या लहान मुलाला अंघोळ घालत होती. पण तेव्हाच ते दोघेही बेशु्द्ध पडले, असे पोलिसांनी सांगितले.पूर्वसंध्येला हे जोडपे मंदिरात जाण्याचा विचार करत होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “जगदीशने राम्याला सांगितले होते की, ते वैकुंठ एकादशीच्या पूर्वसंध्येला मंदिरात भेट देतील. त्यानुसार राम्याने सम्राटला आंघोळीसाठी नेले, पण दोघेही बेशुद्ध पडले.”
बराच वेळ कोणी दरवाजाच उघडला नाही. रम्याचा पती घरी आल्यावर त्याला दार बंद दिसले. तो बराच वेळ दार ठोठावत होता, पण कोणीच उघडले नाही. अखेर त्याने खिडकीतून डोकावून पाहिले. त्याला बाथरूममध्ये पाणी वाहत असल्याचा आवाज आला आणि दरवाजा किंचित उघडा होता. अखेर त्याने जोर लावून दरवाजा तोडला असता त्याला त्याची पत्नी आणि मुलगा बेशुद्ध पडलेले दिसले, असे पोलिसांनी सांगितले.
गॅस गिझरशी संबंधित अशी अनेक प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. काही महिन्यांपूर्वी, बेंगळुरूच्या चिक्काजाला परिसरात राहत असलेले आणखी एक जोडपे गॅस गिझरमधील बिघाडामुळे मृत्यूमुखी पडले होते. मध्ये बिघाड झाल्यामुळे मृतावस्थेत सापडले होते. बाथरूममध्ये विषारी धूर लीक होत असेल आणि त्यासंदर्भात योग्य काळजी घेतली नाही तर घातक परिणाम होऊ शकतात. जर बाथरूम योग्यरित्या हवेशीर नसेल तर परिस्थिती घातक ठरू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला.