गद्दारीचा डाव एकनाथ शिंदे यांनी दीड वर्षांपूर्वीच आखला होता – आदित्य ठाकरे

0
247

पुणे, दि. २० (पीसीबी) – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. शिवसेनेतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. शिंदे गट आणि ठाकरे गट असा दोघांकडूनही धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गद्दारीचा डाव एकनाथ शिंदे यांनी दीड वर्षांपूर्वीच आखला होता असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी अनेक खुलासे केले आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गद्दारीचा डाव एकनाथ शिंदे यांनी दीड वर्षांपूर्वीच आखला होता, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्हाला एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कुणकुण दीड वर्षांपूर्वीच लागली होती. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? असं आम्ही तेव्हाच त्यांना विचारलं होतं. उद्धव ठाकरे हे स्व:त एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होते, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजीकय वर्तळात चर्चेला उधाण आले आहे.