गद्दारांना, पक्ष फोडणा-यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ – संजोग वाघेरे पाटील

0
93
  • महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंचा पनवेल शहरात प्रचार दौरा
  • तरुण, कामगार, शेतकरी, सर्वसामन्यांच्या प्रश्नांसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन

पनवेल – ज्यांनी गद्दारी केली. ज्यांनी पक्ष फोडला. आमदार पळवून महाविकास आघाडीचे सरकार पाडून नियमबाह्य सरकार बनवले. त्या सर्वांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. ते आपण सर्व मिळून करणार आहोत. त्या सोबतच तरुण, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांनी आज, शुक्रवारी (3 मे) पनवेल शहरात प्रचार दौरा केला. त्यावेळी तोंडोरे गाव येथे मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे जिल्हा प्रमुख प्रशांत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक विजय पाटील, माजी नगरसेविका उज्वला पाटील, किरण दाबणे, विष्णू जोशी, माजी सरपंच बेंद्रे पाटील, शिवसेना विभाग प्रमुख हरेश पाटील, महेंद्र पाटील, गट प्रमुख भरत पाटील, शिवसेना पनवेल उपतालुका प्रमुख मनोज पाटील, उपशाखाप्रमुख वासुदेव पाटील, गट प्रमुख हर्षद पाटील, कैलास पाटील, नावडे येथील यशवंत खानोकर, विलास म्हात्रे, जेष्ठ शिवसैनिक अशोक खानवकर यांच्यासह ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, युवावर्ग, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले, मराठी माणसाची अस्मिता आणि स्थान मिळवण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. खरी निशाणी ही मशालच मिळाली होती. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला मानणारे लोक आहेत. गद्दाराच्या हातात काहीच आलेले नाही. सर्वच ठिकाणी पक्ष फो़डून, आमदार व नेते पळवून सरकारे बनवली जात आहेत. हे थांबविण्यासाठी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्र करणार आहे. ही प्रवृत्ती वाईट आणि लोकशाही विरोधी आहे. त्यांना थोपविण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.

उमेदवार संसोग वाघेरे पाटील यांनी पनवेल शहरातीस तोंडारे, पाले ब्रू, कोळीवाडा, गुरुव्दारा कळंबोली, गुरुव्दारा खारघर, खांदा कॉलनी या भागात भेटी देत मतदारांनी साद घातली. त्यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – संजोग वाघेरे
तसेच, गावागावांतील नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्याना घेवून ते तडीस नेण्याचा प्रयत्न करू, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. यापूर्वी ज्या प्रकारे तुमचा विश्वासाघात करण्याचे काम झाले. त्या पध्दतीने मी कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी आपल्यासोबत असेन. त्यासाठी येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला फक्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल चिन्ह लक्षात ठेवा आणि प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.