गदिमा नाट्यगृहात गुरवारी श्रावणसरी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या सौजन्यातून आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पिंपरी चिंचवड तथा मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने तसेच पवित्र अशा श्रावण महिन्याचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील सर्व महिला शिक्षिका भगिनींसाठी गुरुवार, दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता श्रावणसरी (उत्सव पारंपरिक लोककलांचा) या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करण्यात आलेली आहे..
गणेशवंदना, गौळण, लावणी, जात्यावरील ओवी, मंगळागौर अशा महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे सादरीकरण यात केले जाणार आहे.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके व कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्षा सौ. सारिकाताई शेळके यांच्या शुभहस्ते होणार आहे. भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. किरणताई हर्षवर्धन भोईर व मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब औटी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील सर्व शिक्षिकांना आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री. राजूभाऊ भेगडे व श्री. शिवाजीराव ठाकर, उपाध्यक्ष रघुनाथ मोरमारे, कार्यवाह सुहास धस, सहकार्यवाह धोंडिबा घारे, सचिव अमोल चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजी शिंदे व गोरक्ष जांभूळकर यांनी केले आहे.