गणेश विसर्जन निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

0
91

चिंचवड, दि. 08 (पीसीबी): गणेशोत्सव उत्साहात सुरु आहे. दरम्यान रविवार (दि. 8) पासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. रविवारी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. तसेच विसर्जनाच्या वेळी मिरवणुका निघाल्याने वाहतूक कोंडी होते. त्यासाठी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त बापू बंगर यांनी दिले आहेत.

भोसरी वाहतूक विभाग

वाहतूक बदलाचा कालावधी – 11, 13, 17 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतुकीत बदल असतील

बंद मार्ग – फुगेवाडी दापोडी ओव्हरब्रिज मार्गे शितळादेवी चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुण्याकडे जाणारा मार्ग

पर्यायी मार्ग – शितळादेवी चौकातून उजवीकडे वळून सांगवी मार्गे. फुगेवाडी चौकातून हॅरीस ब्रिजच्या अंडरपासमधून बोपोडी मार्गे.

बंद मार्ग – बाबर पेट्रोल पंप ते भोसरी ओव्हर ब्रिज खाली जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – भोसरी ओवर ब्रिज मार्गे पुढे धावडेवस्तीकडे जाऊन सद्गुरुनगर चौकातून यु टर्न मारून भोसरी ब्रिज खाली येऊन दिघी आळंदीकडे जाता येईल.

तळेगाव वाहतूक विभाग

वाहतूक बदलाचा कालावधी – 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत

बंद मार्ग – तळेगाव ते एचपी चौक जाणाऱ्या-येणाऱ्या जड अवजड वाहतुकीस प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – वडगाव फाटा -वडगाव कमान -तळेगाव एमआयडीसी- नवलाख उंबरे- वासुली फाटा येथून.

तसेच एचपी चौकाकडून जांबवडे फाटा, जाधववाडी गाव- नवलाख उंबरे- आंबी एमआयडीसी मार्गे.

बंद मार्ग – वडगाव फाटा ते इंद्रायणी कॉलेज हलक्या व दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग – वडगाव फाटा, निलया सोसायटी कॉर्नर, मंत्रा सिटी रोड मार्गे, हिंदमाता भुयारी मार्ग, जनसेवा वाचनालय इंद्रायणी कॉलेज मार्गे जाता येईल.

बंद मार्ग – चाकण बाजूकडून तळेगावकडे जाण्यास अवजड वाहतुकीस बंद

पर्यायी मार्ग – देहूफाटा अमृतवेल हॉटेल कॉर्नर, इंदोरी बायपास मार्गे, नवलाख उंबरे, तळेगाव एमआयडीसी मार्गे.

बंद मार्ग – मारुती मंदिर चौक ते प्रतीक गारमेंट्स कडे जाणारी वाहतूक बंद. मारुती मंदिर चौकातून जिजामाता चौकाकडे जाणारा येणारा रस्ता बंद. जिजामाता चौक ते गणपती चौक व डोळसनाथ मंदिराकडे जाणारा मार्ग बंद. खांडगे पेट्रोल पंप ते जिजामाता चौक हा दोन्ही बाजूचा मार्ग बंद.

पर्यायी मार्ग – गावठाणातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करून इच्छित स्थळी जाता येईल.

बंद मार्ग – 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत हॉटेल आपुलकी ते इंदोरी गावठाण रस्ता बंद.

पर्यायी मार्ग – इंदोरी बायपास मार्ग व गावठाणातील अंतर्गत रस्त्याने जाता येईल.

सांगवी वाहतूक विभाग

वाहतूक बदलाचा कालावधी – 13 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत

बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून फेमस चौकाकडे जाणारा मार्ग बंद

पर्यायी मार्ग – पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिजमार्गे.

बंद मार्ग – माहेश्वरी चौकाकडून माकण हॉस्पिटल चौक जुनी सांगवीकडे जाणारा मार्ग

पर्यायी मार्ग – बँक ऑफ महाराष्ट्र जुनी सांगवी मार्गे औंध किंवा पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिज मार्गे.

बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून साई चौक ते माहेश्वरी चौकाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा रा घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.


बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून क्रांती चौक/फेमस चौकाकडे जाणारा मार्ग बंदी.

पर्यायी मार्ग – काटे पूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा रा घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.


बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून साई चौकाकडे जाणारा मार्ग बंदी.


पर्यायी मार्ग – काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा रा घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.


बंद मार्ग – साई चौक तसेच कृष्णा चौकाकडून जुनी सांगवी पाण्याच्या टाकीकडे जाण्यास बंदी.


पर्यायी मार्ग – बा रा घोलप-ढोरे फार्म-एमके हॉटेल-मयूरनगरी-काटे पूरम चौक मार्गे.


बंद मार्ग – पाण्याची टाकी जुनी सांगवी ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक तसेच शितोळे पेट्रोल पंपाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – साई चौकातून पाण्याची टाकी जुनी सांगवी पोलीस चौकीजवळून महात्मा फुले ब्रिज कडून औंध मार्गे.

 

वाकड वाहतूक विभाग

वाहतूक बदलाचा कालावधी – 15, 16 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत

बंद मार्ग – साठे चौक येथून दत्त मंदिर रोडवर जाण्यास मनाई.

पर्यायी मार्ग – कावेरीनगर किंवा काळा खडक चौक मार्गे.


बंद मार्ग – वाकड चौकाकडून दत्त मंदिर रोडवर जाण्यास मनाई

पर्यायी मार्ग – वाकड चौकातून कस्पटे कॉर्नर मार्गे.


बंद मार्ग – उत्कर्ष चौकाकडून दत्त मंदिर रोड वाकड येथे येणाऱ्या वाहनांना म्हातोबा चौक येथून प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग – कस्पटे कॉर्नर मार्गे.


पोलारीस हॉस्पिटल चौक दत्त मंदिर रोड तसेच सम्राट चौक दत्त मंदिर रोड येथील वाहतूक गरजेनुसार वळवली जाणार आहे.

 

चिंचवड वाहतूक विभाग

वाहतूक बदलाचा कालावधी – 17 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत


बंद मार्ग – अहिंसा चौक ते चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद

पर्यायी मार्ग – एसएएफ चौकातून खंडोबा माळ मार्गे.


बंद मार्ग – दळवीनगर ब्रिजकडून चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद.

पर्यायी मार्ग – एसकेएफ चौकाकडून बिजलीनगर मार्गे.


बंद मार्ग – वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चापेकर चौकाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसकेएफ-खंडोबा माळ मार्गे.


बंद मार्ग – लिंकरोडवरून चापेकर चौकातील पीएमटी बस थांबा येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी

पर्यायी मार्ग – लिंकरोडने डावीकडे वळून काळेवाडी मार्गे.


बंद मार्ग – भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी

पर्यायी मार्ग – केशवनगर मार्गे


बंद मार्ग – चिंतामणी चौक-वाल्हेकरवाडी रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – चिंचवडेफार्म वाल्हेकरवाडी लंडन ब्रिज रावेत मार्गे.


बंद मार्ग – अहिंसा चौक व रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर उड्डाणपुलावरून जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे. अथवा अहिंसा चौक ते महावीर चौक. अथवा एसकेएफ चौक मार्गे.


हिंजवडी वाहतूक विभाग

वाहतूक बदलाचा कालावधी – 13, 14, 15, 16, 17 सप्टेंबर दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत

बंद मार्ग – टाटा टी जंक्शन चौक – टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रीकल सर्कल व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – टाटा टी जंक्शन चौकाकडून लक्ष्मी चौक मार्गे.


बंद मार्ग – जॉमेट्रीकल सर्कल चौक – जॉमेट्रीकल सर्कल चौकाकडून मेझा 9 व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – टाटा टी जंक्शन चौक-लक्ष्मी चौक मार्गे.


बंद मार्ग – मेझा 9 चौक – मेझा 9 चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – लक्ष्मी चौक मार्गे.


बंद मार्ग – शिवाजी चौक – शिवाजी चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – शिवाजी चौक-विप्रो सर्कल फेज एक चौक-जॉमेट्रीकल सर्कल-टाटा टी जंक्शन मार्गे.


बंद मार्ग – कस्तुरी चौक – कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – विनोदे वस्ती कॉर्नर-लक्ष्मी चौक मार्गे.


बंद मार्ग – जांभूळकर जिम चौक – शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – इंडियन ऑईल चौक-कस्तुरी चौक-विनोदे वस्ती कॉर्नर मार्गे.


बंद मार्ग – इंडियन ऑईल चौक – जांभूळकर जिम व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – कस्तुरी चौकातून विनोदे वस्ती कॉर्नर मार्गे.

 

पिंपरी वाहतूक विभाग

वाहतूक बदलाचा कालावधी – 13, 15, 17 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री 12 वाजेपर्यंत


बंद मार्ग – पिंपरी चौकाकडून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग बंद


पर्यायी मार्ग – पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगर मार्गे. मोरवाडी मार्गे एम्पायर इस्टेटच्या मदर टेरेसा ब्रिजवरून काळेवाडी मार्गे.


बंद मार्ग – काळेवाडी पुलावरून डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास बंदी.


पर्यायी मार्ग – काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म-मुंबई पुणे महामार्ग मार्गे.


बंद मार्ग – पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग – पिंपरी सर्विस रोडने क्रोमा शोरूम मार्गे.