गणेश विसर्जनाला पिंपरी बाजार बंद, मर्चंट फेजरेशनचा निर्णय

0
106

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – गणेश विसर्जन मिरवणुकिला कुठलाही अडथळा होऊ नये म्हणून अनंत चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी १७ सप्टेंबरला पिंपरी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय पिंपरी मर्चंट फेडरेशनने घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी त्याबाबतचे प्रसिध्दीपत्र काढले आहे.
संघटनेच्या सभासदांची नुकतीच एक बैठक पार पडली. विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात असते आणि गणेश भक्तांची गर्दी रस्त्यावर असते. अशा वेळी कुठलाही अडथळा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी साचंकाळी सहा पासूनच संपूर्ण पिंपरी कॅम्प बाजारपेठ बंद राहणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकिचा आनंद घेण्यासाठी व्यापारी आपल्या कुटुंबियांसह या मिरवणुकत सहभागी होणार असल्याचे आसवाणी यांनी पत्रकात म्हटले आहे.