गणेश तलावातील जलपर्णी काढण्याची मागणी

0
349

निगडी, दि. ४ (पीसीबी) – निगडी प्राधिकरण मधील गणपती विसर्जन घाट गणेश तलावामधे मोठ्या प्रमाणता जलपर्णी वाढली आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे तलावाच्या आजूबाजुच्या परिसरात मच्छरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तलावातील जलपर्णी तत्काळ काढण्याची मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष निखिल दळवी यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात दळवी यांनी म्हटले आहे की, गणेश तलाव स्वच्छता होत नसल्यामुळे परिसत दुर्गंधी पसरली आहे. जलपर्णीमुळे तलावात पाणी आहे की नाही हे देखील समजून येत नाही. संपूर्ण गणेश तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी परसली आहे. येत्या सेप्टेंबर महिन्यात म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन आहे. गणेश तलाव येथे ही विसर्जन घाट आहे. दर वर्षी परिसरातील लाखो भाविक आपले गणपती विसर्जन करण्यास गणेश तलाव येथे येत असतात.

अनंत चतुर्दशी अगोदर गणेश तलाव मधील जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करावा. जलपर्णीमुळे परिसरात होणारे मच्छर, दुर्गंधीचा ही परिसरातील नागरिकांना त्रास सहन करवा लागत आहे. त्यामुळे गणेश तलाव मधील जलपर्णी व साठलेली घान लवकरात लवकर काढावी. गणेश तलाव स्वच्छ करावा.