गणेशोत्सवानिमित्त मित्र घरी राहायला आला आणि घरातील वस्तू घेऊन गेला

0
119

हिंजवडी,दि. १६ (पीसीबी) – गणेशोत्सवानिमित्त मित्र घरी राहायला आला. त्यानंतर त्याने घरातील आयफोन, गाडीची व घराची चावी, तसेच रोख रक्कम चोरून नेली. मित्राच्या फोन पेवरून एक लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. ही घटना 5 सप्टेंबर रोजी बावधन येथे घडली.

बृहदिष हरीशकुमार (वय 27, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपककुमार राकेशकुमार (वय 28, रा. दिल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपककुमार हा फिर्यादी यांच्या ओळखीचा आहे. तो गणेशोत्सवानिमित्त फिर्यादी यांच्या घरी राहायला आला. त्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांचा 30 हजार रुपये किमतीचा आयफोन, गाडीची आणि घराची चावी, तसेच कपाटामध्ये ठेवलेले 50 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेले. त्यानंतर फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या फोन पे द्वारे एक लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.