गणेशोत्सवाच्या काळात सर्व शाळांना पाच दिवस सुट्टी

0
4

मुंबई, दि. ८ – गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात असल्यामुळे गावी जात असतात. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात सर्व शाळांना पाच दिवस सुट्टी देण्यात येणार आहे. या काळात कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. असे सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्सहात पार पडणार आहे. त्यामुळे शिवसेना नेते, आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सहसचिव परशुराम तपासे व संतोष धोत्रे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश पंकाळ यांना पत्र पाठवले होते. त्यांच्या या मागणीला मोठे यश आले आहे.

तर राज्य सरकारने २०२५ या वर्षात जाहीर केलेल्या गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या शासकीय सुट्टीत बदल केले आहेत. त्यानुसार या सुट्टय़ांऐवजी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी असणार आहे. ही स्थानिक सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू असेल. त्यामुळे आजपासून तीन दिवस मुंबईतील शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.

शिवसेना नेते, आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सहसचिव परशुराम तपासे व संतोष धोत्रे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश पंकाळ यांना पत्र पाठवले होते. राज्यात गणेशोत्सव, दिवाळी व अन्य धार्मिक सण उत्सवाच्या काळात शाळांना अल्प मुदतीच्या विशेष सुट्टय़ा जाहीर करण्याच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे. उत्सवाच्या काळात शाळांनी कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत, असे आदेश जारी केले आहेत. पण तरीही अनेक शाळा या शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत नाहीत.

गणेशोत्सव काळात पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मूळ गावी जातात. त्यामुळे नियमित शालेय उपस्थिती व शैक्षणिक कामाकाजावर परिणाम होते. त्यामुळे गणेशोत्सवात पाच दिवसांची सुट्टी जाहीर करावी तसेच सीबीएससी, आयसीएससी, आयबी अशा अन्य बोर्डाच्या शाळांत सुट्टीच्या संदर्भातील आदेशाचे पालन करणार नाहीत अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने पाठवण्यात आलेल्या करण्यात आली आहे.

युवासेना आणि शिवसेनेची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. महापालिका शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांनी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांना पत्र पाठवले आहे. पालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या अनुदानित, विनाअनुदानित तसेच इतर बोर्डाच्या खासगी प्राथमिक शाळांनी गणेशोत्साच्या सुट्टीमध्ये परीक्षांचे आयोजन करू नये असे पत्रकात नमूद केले आहे.