गडकिल्ल्यांवर धुडगूस घालणाऱ्यांना भाजप आमदाराचा इशारा

0
11

पिंपरी,दि.24 (पीसीबी)
भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी नूतन वर्षाच्या आधीच गडकिल्ल्यांवर धुडगूस घालणाऱ्यांना इशारा दिला आहे. हे भाजपचं हिंदुत्ववादी सरकार आहे. ३१ डिसेंबरला आपापल्या घरी पार्टी करायची असा थेट इशारा तरुण- तरुणींना दिला आहे. अमित गोरखे हे पिंपरी- चिंचवड मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमित गोरखे यांनी ३१ डिसेंबरच्या निमित्ताने थेट पार्टी करणाऱ्या तरुण- तरुणींना इशारा दिला आहे. ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्य भूमी आहे. ३१ डिसेंबरला आपापल्या घरी पार्टी करायची, गडकिल्ल्यांवर धुडगूस घालणार असाल तर तुम्हाला शिवप्रेमी धडा शिकवतील. तरुण- तरुणींनी धुडगूस घालू नये अस आवाहन करत इशारा दिला आहे. भाजप चे आमदार अमित गोरखे यांनी हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहरातून सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोरखे यांनी दिलेला हा इशारा कितपत योग्य ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.