गटनेतेपदासाठी राहुल शेवाळे, प्रतोदपदी भावना गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

0
331

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद म्हणून भावना गवळी यांना मान्यता देण्यात आलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मान्यता दिली.

शिवसेनेच्या 12 खासदारांनी शेवाळे यांनी गवळी यांचं पत्र दिलं होतं. ते पत्र ओम बिर्ला यांनी स्वीकारलंय. त्यामुळे आता गटनेतेपदासाठी राहुल शेवाळे आणि प्रतोदपदी भावना गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.

दिल्लीत आज (19 जुलै) दुपारी शिवसेनेच्या 12 खासदारांची ओम बिर्ला यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत ओम बिर्ला यांना हे पत्र देण्यात आलं होतं. त्यामुळे या बैठकीनंतर ओम बिर्लाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र बिर्ला यांनी ग्रीन सिग्नल दिला.