गजानन मारणेचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल, पोलिसांची नाचक्की

0
1252

दि २० मे (पीसीबी ) – पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तीन वर्षापूर्वी ठाणे जेलमधून सुटल्यावर वाहनांच्या ताफ्यात जल्लोष करत मुंबई पुणे एक्सप्रेसवेला दहशत निर्माण केली होती. अगदी अलिकडे निवडणुक काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार याेंच्या बरोबरची भेट गाजली. आता पुन्हा गजानन मारणे याच्या एका समर्थकाने व्हिडीओ व्हायरल केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्याचे नवीन आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. मात्र परत एकदा गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण करणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
गजानन मारणे याच्या समर्थकाने नंबर प्लेट नसलेल्या मोठ्या आवाजाच्या गाड्या टोळक्याने फिरवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की गजानन मारणे या गांड्याची पुजा करत असून नारळ फोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळाला आहे.
या व्हिडीओमुळे गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण केलं जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी सर्व गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालयात एकत्रित करून निर्बंध घालून देण्यात आले होते. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात असे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवल्याने एक प्रकारे आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार पदभार स्वीकारल्यावर पुण्यातील 267 गुन्हेगारांना आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलं होतं. गुन्हेगारांची ओळख परेड सुरू असताना मीडियालाही लाईव्ह करण्याची परवानगी देत पोलिसांनी गुन्हेगारांना तंबी दिली. याआधी फक्त ज्या गुन्हेगारांची नावं ऐकलीत टोळीच्या म्होरक्यांना सर्वांनी पाहिलं. यामध्ये गजा मारणे, बंडू आंदेकर, निलेश घायवळ, बाब बोडकेसह इतरही टोळीच्या म्होरक्यांना ओळख परेडसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलेलं.