गंधर्वनगरी येथे सव्वा लाखाची घरफोडी

0
540

मोशी, दि. २९ (पीसीबी) – मोशी येथील गंधर्वनगरीमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एक लाख 23 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सागर नामदेव गडसिंग (वय 24, रा. गंधर्वनगरी मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचे घर शनिवारी रात्री आठ वाजता कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला. बेडरूम मधील लाकडी कपाटाच्या लॉकर मधून एक लाख 23 हजार 200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. फिर्यादी रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.