ख्रिसमसचा खरा आनंद आज तरुणाईला मिळाला – अभिनेत्री शिवानी सोनार..

0
450

निगडीतील कॅफे ‘ Bits n Bites ‘ च्या ” ख्रिसमस वीक सेलिब्रेशनमुळे ” कॅफे प्रेमींमध्ये संचारला उत्साह…

पिंपरी ,दि. २९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात सर्वधर्मीयांकडून ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यंदा सर्वांचे लक्ष वेधले ते निगडी, यमुनानगरमधील कॅफे ‘ Bits n Bites ‘ च्या ” ख्रिसमस वीक सेलिब्रेशन ” या धूमधडाका ऑफरने. तसेच ग्राहक आणि उपस्थितांची मने जिंकून घेतली ती ख्रिसमसनिमित्त खास आकर्षण प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या प्रमुख उपस्थितीने.

दरम्यान २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत आठवडाभर या कॅफेतील विविध पदार्थांवरील आकर्षक ऑफर आणि ख्रिसमसदिनी झालेला जल्लोष अवर्णनीय ठरला. ख्रिसमससाठी सीक्रेट सांता, फोटो सजावट आणि ख्रिसमस थीम यासारख्या ख्रिसमस स्पेशलने ग्राहकांना भुरळ घातली. कॅफे Bits n Bites ला नेहमीच ग्राहकांचा प्रतिसाद असतो. परंतु, सप्ताहभर ग्राहक २५ डिसेंबर ची वाट पाहत होते. त्यांना ख्रिसमस सेलिब्रेशनचा एक भाग बनायचे होते. यात ख्रिसमस ट्री अनेकांचा आकर्षण ठरला. प्रमुख पाहुण्या अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यावेळी भव्य अशी आतिषबाजी झाली. चाहत्यांनी अभिनेत्री शिवानीसोबत सेल्फीसाठी गर्दी केली होती.

यावेळी मनसे अध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेवक उत्तम केंदळे, यमुनानगरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्ग,  कॅफेचे मालक विनोद चव्हाण, संचालिका गांधली चव्हाण, माजी नगरसेवक शशीकिरण गवळी, अभिनेत्री शिवानी यांचे आई, वडील, ओमकार पवळे, विशाल केंदळे, अजिंक्य उबाळे, विवेक गवळी, ग्राहक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिनेत्री शिवानी सोनार म्हणाल्या, दरवर्षी मुलं आणि तरुणाई सांताक्लॉज आणि भेटवस्तूंची प्रतीक्षा करतात. कारण त्यांना सांताक्लॉजशिवाय ख्रिसमस अपूर्ण वाटतो. परंतु इथे आल्यावर ती कल्पना फोल ठरली. ख्रिसमसचा खरा आनंद कॅफे Bits n Bites च्या या अद्भुत आयोजनामुळे आज तरुणाईला मिळाला, असे मला वाटते म्हणत तिने ख्रिसमस नाताळच्या ग्राहक आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

ख्रिसमस वीक सेलिब्रेशनबद्दल माहिती देताना कॅफेचे संचालक विनोद चव्हाण म्हणाले, गेली आठवडाभर या कॅफेने निगडीसह शहरातील कॅफे प्रेमींचे लक्ष ‘ Bits n Bites ‘ कडे विचलित केले. त्यात शर्करायोग म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ” राजा राणीची ग जोडी फेम ” शिवानी सोनार हिची प्रमुख उपस्थिती लक्षणीय ठरली. सांताक्लॉज पाहून लहान मुले आणि मोठेही खुश झाले. आमच्या अनेक ग्राहकांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल आमच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. तसेच या उपक्रमाचा भाग बनविल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमासाठी माणुसकी फाउंडेशनचे भरपूर सहकार्य लाभले. ग्राहकांचा नेहमीच आम्हाला पाठींबा असतो. यापुढेही असेच नाविन्यपूर्वक उपक्रम राबविण्यावर भर देणार आहे.